जे सत्य अमेरिकेतील शास्त्रज्ञ सांगतात, ते आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना न कळणे, हे दुर्दैवी ! मंदिरात जाण्याचे राजकारण करणार्या राहुल गांधी यांच्या काँग्रेसला ही चपराक होय ! याविषयी आता त्यांनी अधिकृत भूमिका मांडली पाहिजे आणि हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : अमेरिकेच्या ‘सायन्स चॅनेल’या वाहिनीने शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभाग यांनी बनवलेला अहवाल प्रसारित केला आहे. या अहवालानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असणारा रामसेतू ७ सहस्र वर्षे प्राचीन आहे. तसेच ३० मैल क्षेत्रावर पसरलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. यासंदर्भात या अहवालात पुरावेही देण्यात आले आहेत.
हिंदु धर्मग्रंथांनुसार श्रीरामाने लंकेवर स्वारी करतांना रामेश्वरम्पासून श्रीलंकेच्या भूमीपर्यंत दगडांचा सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. समुद्रात असलेल्या या सेतूची खोली ३ फुटांपासून ३० फुटांपर्यंत आहे. भारतात याला रामसेतू तर जगभरात ‘अॅडम्स ब्रिज’ या नावाने ओळखले जाते. वर्ष २००७ मध्ये रामसेतू तोडून नौकांसाठी मार्ग बनवण्याचा घाट तत्कालीन काँग्रेस सरकारने घातला होता. तसेच याविषयी काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रावरून वाद झाला होता.
सायन्स चॅनलने प्रसारित केलेल्या वृत्तात शास्त्रज्ञांनी मांडलेली सूत्रे
१. रामसेतू मुळीच काल्पनिक नाही.
२. हिंदु धर्मग्रंथांनुसार प्रभु श्रीरामाने सेतू बनवल्याचा उल्लेख आहे.
३. हा सेतू नैसर्गिक नाही, तर मानवनिर्मित आहे.
४. रामसेतूवरील दगड प्राचीन आणि इतर दगडांपेक्षा वेगळेच आहेत.
५. रामसेतूसाठी वापरलेले दगड दुसरीकडून आणण्यात आले असावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात