Menu Close

जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करा – हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिसांना निवेदन

tsun01
जयसिंगपूर येथे पोलीस उपनिरीक्षक घुले (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवार, २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत कोकाटे यांचे राजर्षी शाहू नाट्यगृह येथे व्याख्यान आयोजित केले आहे. कोकाटे यांचा पूर्वइतिहास पहाता त्यांनी आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमांतून हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, संत यांच्या विरोधात प्रत्येक कार्यक्रमांतून विद्वेष पसरवणारी आणि गरळ ओकणारी वक्तव्ये केली आहेत. धर्मप्रेमी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आधार नसलेली अनेक अयोग्य विधाने करून कोकाटे शिवद्रोहच करत आहेत. अशांच्या व्याख्यानांमुळे समाजात फूट पडत असून मोठ्या प्रमाणात धार्मिक तणाव निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करावे, अशा मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जयसिंगपूर येथे पोलीस उपनिरीक्षक घुले यांना २१ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. (सातत्याने हिंदुत्वविरोधी आणि ब्राह्मण समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला विरोध करणार्‍या सर्वच हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या वेळी ब्राह्मण सेवा संघाचे सर्वश्री संजय कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, रा.स्व. संघाचे सर्वश्री हेमंत गोखले, विनायक अणेगिरीकर, श्री. उदय कुलकर्णी, हिंदु धर्माभिमानी श्री. संजय वैद्य, बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. विजय धंगेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री जितेंद्र राठी, अण्णासाहेब वरेकर, बजरंग दलाचे सर्वश्री विकी धंगेकर, संदीप गोसावी, सोमनाथ गोसावी, अभिषेक पाटील, अमर जुवे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *