सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मिंटो उपनगरामध्ये एक भव्यदिव्य भुयारी शिवमंदिर उभारण्यात आले आहे. या शिवमंदिरात नुकतीच एका साडेचार फूट उंच संगमरवरी शिवमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये १३ वे ज्योतिर्लिंग स्थापन करण्यात आल्याचा दावा ऑस्ट्रेलियाकडून केला जात आहे. भारतीय वारसा जपणारी ही वास्तू असून भारतातही अशा प्रकारचे शिवमंदिर नसल्याचा दावा केला जात आहे. मुक्ती गुप्तेश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे जगातील एकमेव मानवनिर्मित भुयारी मंदिर आहे.
१३ व्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारतात आढळतो. मुक्ती गुप्तेश्वर महादेव असे या ज्योतिर्लिंगाचे नाव आहे. ११ ज्योतिर्लिंगे भारतात आणि १ नेपाळमध्ये आहे. १३ वे ज्योतिर्लिंग वर्ष १९९९ पर्यंत नेपाळच्या राजाची मालमत्ता होती. वर्ष १९९९ मध्ये नेपाळचे महाराजाधिराज वीरेंद्र वीर विक्रम शहा देव यांनी हे शिवलिंग ऑस्ट्रेलियाला भेट म्हणून दिले, असे म्हटले जात आहे. वर्ष १९९९ मध्ये या ज्योतिर्लिंगाची ऑस्ट्रेलियामध्ये स्थापना करण्यात आली. हल्लीच त्या ठिकाणी भव्यदिव्य असे भुयारी मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात प्रतिदिन शिवपूजा केली जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात