Menu Close

मोहसीन शेख खटल्यातून अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची गच्छंती काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांच्यामुळे !

हिंदुद्वेष्ट्या मानसिकतेतून वागणारे धर्मांध ! धर्मांध व्यक्ती कुठल्याही पदावर असली, तरी ती पहिला धर्माचाच विचार करते, हे यातून दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

 

पुणे : सामाजिक प्रसारमाध्यमांमधून महापुरुषांची विटंबना केल्याने हडपसर येथे वर्ष २०१४ मध्ये उसळलेल्या दंगलीत मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. अधिवक्ता उज्ज्वल निकम या खटल्याचे कामकाज पहात होते; मात्र त्यांनी या खटल्यातून नंतर माघार घेतली. या प्रकरणी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अधिवक्ता निकम यांची या खटल्यातील नियुक्ती रहित करावी’, असे पत्र लिहिले होते. राष्ट्रप्रेमी कृती समितीचे अंजुम इनामदार यांनी केलेल्या मागणीवरून ही मागणी करत असल्याचे दलवाई यांनी म्हटले होते. अंजुम इनामदार यांचे म्हणणे होते की, सावरकर स्मृती प्रतिष्ठान या कट्टर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने उज्ज्वल निकम यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित खटला असल्याने अधिवक्ता निकम त्यांचे कामकाज निष्पक्षपातीपणे करू शकणार नाही. याविषयी इंडियन एक्सप्रेसने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते.

याविषयी समजल्यावर अधिवक्ता निकम यांनी या प्रकरणातून त्यांना मुक्त करण्याची विनंती केली आणि न्यायालयानेही ती मान्य केली. ‘प्रामाणिकपणे काम करूनही जर आरोपी सुटले, तर खासदार हुसेन दलवाई आणि तो पत्रकार हे कांगावा करतील’, त्यामुळे या खटल्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे अधिवक्ता निकम यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *