Menu Close

बांगलादेशमध्ये श्री श्री सत्यनारायण काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशी मुसलमानांना भारत सरकार आश्रय देते; पण बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांच्या संदर्भात काही करत नाही ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : बांगलादेशच्या चुआदंगा जिल्ह्यात असलेल्या अलामदांगा गावातील श्री श्री सत्य नारायण काली मंदिरातील श्री काली देवीच्या मूर्तींची ६ धर्मांधांनी ७ डिसेंबर या दिवशी तोडफोड केली. मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्‍वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.

बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेश मायनॉरीटी वॉच या संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याशी दूरभाषवर संपर्क केला तेव्हा आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

अधिवक्ता घोष यांनी आरोपींना कडक शिक्षा करावी, तसेच शासनाने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आक्रमणे होणार नाहीत, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *