Menu Close

पूर्णचंद्र (पौर्णिमा) असणार्‍या रात्री दुचाकीच्या अपघातांची शक्यता अधिक ! – कॅनडा आणि अमेरिका येथील संशोधकांचा निष्कर्ष

असा अभ्यास भारतातील संशोधक कधीच करत नाहीत; कारण असा अभ्यास करणे म्हणजे मागासलेपणा किंवा अंधश्रद्धा असल्यासारखे त्यांना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

न्यूयॉर्क : पौर्णिमेला म्हणजेच पूर्णचंद्र असतांना दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, या दिवशी दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत होते आणि अपघात होतात. जगभरात दुचाकींच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. रस्ते अपघातामध्ये लक्ष विचलित झाल्यानेच ते होत असतात. (अमावास्या किंवा पौर्णिमा यांचा मनावर परिणाम होतो, तसाच आध्यात्मिक परिणामही होतो, हे ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. त्याचा अभ्यास केला, तर जगातील अनेक संकटांपासून रक्षण होऊ शकते किंवा त्यावर उपाय योजता येऊ शकतात ! हिंदु राष्ट्रात याचा अभ्यास करून मार्गदर्शन केले जाईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कॅनडा येथील ‘यूनिव्हर्सिटी ऑफ टॉरंटो’ आणि अमेरिकेतील ‘प्रिंसटन यूनिव्हर्सिटी’ यांच्या संशोधकांनी संशोधन करतांना पूर्णचंद्र याच्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर होणार्‍या रस्ते अपघातांची माहिती घेऊन त्यांची तुलना केली आहे. वर्षामध्ये १२ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.

१ सहस्र ४८२ रात्रींच्या वेळी १३ सहस्र २९ जण दुचाकीच्या अपघातात सापडलेे. यातील ४९४ रात्री पूर्ण चंद्र असणार्‍या होत्या, तर ९८९ रात्री सामान्य चंद्र असणार्‍या होत्या. वर्ष १९७५ ते वर्ष २०१४ या कालावधीत पूर्ण चंद्राच्या ४९४ रात्रींमध्ये ४ सहस ४९४ अपघात झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *