मुंबई : इतिहासाचे विकृतीकरण करून चित्रपट बनवणार्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्यावर नाचतांना दाखवून राणी पद्मावती यांचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे असे इतिहासद्रोही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करू नयेत, या आशयाचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने चित्रपटगृह मालकांना देण्यात येत आहेत. दादर येथील ‘प्लाझा सिनेमा’चे व्यवस्थापक मोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई अध्यक्ष श्री. बळवंत दळवी, श्री. विनायकराव, स्वप्नील म्हात्रे आणि अन्य धारकर्यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात