न्यायालयाच्या आदेशाचे कारण सांगून केवळ हिंदूंच्याच धार्मिक स्थळांवर कारवाई करणे सयुक्तिक आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरचे (लिंकरोड) श्री हनुमान मंदिर अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर १४ डिसेंबरला पाडण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ४ घंटे खोळंबली होती.
या मंदिरामुळे मार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती, असे म्हटले जाते. मंदिर पाडण्यासाठी महापालिकेने कारवाई चालू केल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांसह पोलिसांचा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता. (मशिदींवरील भोंगे काढा, असे न्यायालयाने आदेश दिलेले असतांनाही ते भोंगे पोलीस बंदोबस्तात काढण्याचे धाडस महापालिका दाखवणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात