कॅथलिक चर्चमध्ये सर्वाधिक लैंगिक शोषण
ख्रिस्त्यांच्या देशांत चर्चमधील पाद्य्रांकडून करण्यात येणार्या लैंगिक शोषणाची चौकशी करण्याचा, संबंधितांना दंड करण्याचा प्रयत्न होतो, तसेच याचे वृत्तही प्रसारित होते; मात्र निधर्मी भारतात याविषयी जाणीवपूर्वक मौन बाळगले जाते आणि प्रसारमाध्यमेही अशी वृत्ते दडपतात ! संपादक, दैनिक सनातन प्रभात
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या ५ वर्षांच्या चौकशीनंतर आयोगाकडून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात देशातील अनेक संस्था ६ दशकांपासून लहान मुलांची देखभाल करण्यास अपयशी ठरल्या आहेत आणि सहस्रो मुले लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत. बळी पडलेल्यांची संख्या सांगू शकलो नाही, तरी ही राष्ट्रीय समस्या आहे, असे या आयोगाने या अहवालामध्ये म्हटले आहे. या शोषणामध्ये सर्वाधिक शोषण कॅथलिक चर्चमध्ये झाल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
१. वर्ष १९५० ते वर्ष २०१० या कालावधीत ७ टक्के कॅथलिक पाद्य्रांवर बालकांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले; मात्र त्यांची कधीही चौकशी करण्यात आली नाही.
२. वर्ष २०१२ मध्ये द रॉयल कमीशन इंटू इंस्टिट्यूशनल रेस्पोन्सेस टू चाइल्ड सेक्सुअल अब्यूज या संस्थेला या संदर्भात चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता.
३. या संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार चर्चच्या अधिकार्यांकडे बालकांच्या लौंगिक शोषणाच्या ४ सहस्र ४४४ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील १५ टक्क्यांहून अधिक आरोप पाद्य्रांवर करण्यात आले होते.
४. या चौकशीमध्ये चर्च, अनाथालय, क्रीडा संकुल, युवकांचे समूह आणि शाळा लैंगिक शोषण झालेल्या १५ सहस्र मुलांशी संपर्क करण्यात आला होता. त्यात त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. एकूण ४ सहस्र संस्थांमध्ये अशा प्रकारचे अत्याचार झाले आहेत. यात कॅथलिक चर्चची संख्या सर्वाधिक आहे.
सतना (मध्यप्रदेश) येथे धर्मांतर केल्याच्या आरोपावरून एका पाद्य्राला अटक
पोलीस ठाण्याबाहेर पाद्य्रांच्या गाडीची जाळपोळ
अशा पाद्य्रांना देशातून बाहेर हाकलून दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सतना (मध्यप्रदेश) : येथील भूमकार गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी ३० हून अधिक पाद्य्रांना कह्यात घेतले होते. त्यानंतर यातील एका पाद्य्राला या प्रकरणी अटक करण्यात आली, तर उर्वरितांना सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेले पाद्री जॉर्ज यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. बजरंग दलाने धर्मांतराचा आरोप केला होता. पोलिसांनी पाद्य्रांना कह्यात घेतल्यावर यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आलेल्या अन्य पाद्य्रांची चारचाकी गाडी अज्ञातांकडून जाळण्यात आली. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गावातील २१ वर्षीय तरुण धर्मेंद्र दोहर म्हणाले, गेल्या २ वर्षांपासून मिशनरी येथे सक्रीय आहेत. ते धर्मांतर करण्यासाठी तलावात डुबकी लावल्यानंतर ५ सहस्र रुपये, एक क्रॉस आणि बायबल देतात. मला धर्मांतरासाठी त्यांनी पैशांचे आमीष दाखवले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात