Menu Close

हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे इतिहासाचे विकृतीकरण असणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन रहित

हिंदूंनो, या यशाप्रती श्रीकृष्णचरणी कृतज्ञता व्यक्त करा !

रत्नागिरी : शहरात इतिहासाचे विकृतीकरण असणारा बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी १७ डिसेंबर या दिवशी दर्शवलेल्या विरोधामुळे या चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन आज १८ डिसेंबर या दिवशी रहित करण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित करण्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पतंजली योग समिती, चित्पावन ब्राह्मण साहाय्यक संघ, रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघ, व्याडेश्‍वर मित्र भजन मंडळ, रिक्शा संघटना, शिवसेना, भाजप, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी विरोध दर्शवला होता.(चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन ! – संपादक)      

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी हा चित्रपट संपूर्ण देशात १८ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित होणार होता. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि येथील श्रीराम चित्रमंदिर अन् सिटीप्राईड राधाकृष्ण चित्रमंदिर या चित्रपटगृहांचे व्यवस्थापक यांना निवेदन देऊन हा चित्रपट शहरात आणि तालुक्यात प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी केली होती.

हिंदुत्ववादी संघटनांच्या एकजूटीममुळे हा चित्रपट रत्नागिरीत आज प्रदर्शित होऊ शकला नाही. (संघे शक्ती कलौ युगे । अर्थात् कलियुगात संघटितपणातच शक्ती आहे, या उक्तीप्रमाणे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र शीघ्रगतीने स्थापन होण्यास साहाय्य होईल ! – संपादक)    

याशिवाय समितीचे श्री. अनिल जठार यांनी शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख श्री. प्रमोद शेरे यांना संपर्क करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना हा चित्रपट दोन्ही चित्रपटगृहांत प्रदर्शित न करण्याबाबत सांगायची विनंती केली होती. त्याला श्री. शेरे यांनी तत्परतेने प्रतिसाद देत चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना संपर्क केला होता. याचा परिणाम चित्रपटाचे प्रदर्शन रहित करण्यात आले.

चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे शिवसेनेचे आमदार श्री. राजन साळवी आणि रत्नागिरी शहरप्रमुख श्री. प्रमोद शेरे यांचे अभिनंदन !

१७ डिसेंबरच्या रात्री हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी नागपूर येथे अधिवेशनासाठी गेलेले शिवसेनेचे आमदार श्री. राजन साळवी यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट दोन्ही चित्रपटगृहांत प्रदर्शित करू नये, असे त्यांना सांगायची विनंती केली होती. त्याला आमदार श्री. साळवी यांनी तत्परतेने प्रतिसाद देत चित्रपटगृहाच्या मालकांना संपर्क केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *