Menu Close

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास इंटरपोलचा नकार

नवी देहली : आतंकवाद्यांचे पाठीराखे असणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे सांगत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला आहे. डॉ. झाकीर यांच्याशी संबंधित माहिती हटवावी, असे निर्देश इंटरपोलने सर्व कार्यालयांना दिले आहेत. डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अजून आरोपपत्र प्रविष्ट नसून नियमानुसार केवळ संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) ऑक्टोबरमध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्याविरोधात ४ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

 

आरोपपत्रात १५० साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांचा समावेश होता. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था आणि हार्मोनी मीडिया या आस्थापन यांच्या विरोधात हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

१. इंटरपोलच्या या निर्णयावरून त्यांना आरोपपत्राची माहिती देण्यात आलेली नाही, असे दिसते. आम्ही आरोपपत्राविषयीचा तपशील इंटरपोलला देऊ, अशी माहिती एन्आयएमधील सूत्रांनी दिली.

२. दुसरीकडे डॉ. झाकीर नाईक यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देतांना, पुराव्यांअभावी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस रहित केल्याने मी निर्धास्त झालो आहे. आता भारतीय सुरक्षायंत्रणाही खोट्या गुन्ह्यातून मला मुक्त करतील, असे म्हटले आहे.

रेड कॉर्नर नोटीस न पाठवण्यामागे चीन

सध्याचे इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे चीनचे नागरिक आहेत. ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विश्‍वासू आहेत. डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस न पाठवण्याला मेंग हेच कारणीभूत आहेत. यापूर्वी चीनने पाकमधील जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यामध्ये अडथळे आणले होते आणि आता याही प्रकरणात तो नाक खुपसत आहे. मेंग यांनी त्यांच्या देशातील उघूर वंशांच्या जिहादी आतंकवाद्यांना विदेशातून पकडून आणण्यासाठी मात्र प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे १२ हून अधिक आतंकवाद्यांना पकडून चीनकडे दिले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *