Menu Close

आफ्रिकेतील गॅबॉन देशात एका व्यक्तीकडून अल्लाहु अकबर म्हणत दोघा विदेशी पत्रकारांवर चाकूने आक्रमण

लिब्रेव्हीला (गॅबॉन) : मध्य आफ्रिकेतील गॅबॉन देशाची राजधानी लिब्रेव्हीला येथे एका व्यक्तीने दोघा विदेशी पत्रकारांवर चाकूने आक्रमण केले. आक्रमण करतांना तो मोठ्याने अल्लाहू अकबर असे म्हणत होता. हे दोघेही पत्रकार डेन्मार्कचे असल्याचे म्हटले जात आहे. हे आक्रमण अमेरिकेमध्ये मुसलमानांवर होत असलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी करण्यात आले, असे येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. गॅबॉनचे संरक्षणमंत्री अँटनी मस्सार्ड म्हणाले की, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते आक्रमण करणारी ५३ वर्षीय नायजेरियन व्यक्ती होती. पोलिसांनी तिला अटक केली असून तिची चौकशी करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *