यवतमाळ येथील व्यापारी संघटनेचा निर्धार !
प्लास्टिक तसेच कागदी राष्ट्रध्वजाची खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेणार्या व्यापारी संघटनेचे अभिनंदन ! हाच आदर्श अन्य व्यापार्यांनीही घेतल्यास राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या घटना रोखता येतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
यवतमाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची खरेदी-विक्री करणार्या जिल्ह्यातील ठोक व्यापार्यांची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये व्यापार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यापुढे राष्ट्रध्वज खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या मोहिमेस सक्रीय पाठिंबा दिला.
१. हिंदु जनजागृती समिती प्रतीवर्षी राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवत असते. त्या अंतर्गत मागील वर्षी काही व्यापार्यांच्या भेटी घेतल्या असता, त्यांनी सांगितले की, या वर्षी उशीर झालेला आहे. कारण १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या १ मास आधी खरेदीचा व्यवहार होत असतो.
२. पुढील वर्षी आम्ही प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वज खरेदी करणार नाही. नोव्हेंबर मासात समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी शहरातील १० ठोक व्यापार्यांची बैठक घेऊन त्यांना हा विषय सांगितला. कटलरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. भीमसेन बत्रा यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात