Menu Close

देव न मानणार्‍या डॉ. पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्या हेतूचा तपास करावा ! – बजरंग दल आणि भक्त यांची मागणी

  • श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेशाचे प्रकरण

  • जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन

पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ आणि देवीभक्त

कोल्हापूर : येथील करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला. या प्रकरणी डॉ. पाटणकर यांच्यावर मंदिर सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, धार्मिक भावना दुखावणे, अवैधरित्या जमाव जमून घोषणाबाजी करणे, आदी गुन्हे नोंद करावेत, तसेच देव न मानणार्‍या डॉ. पाटणकर यांचा देवीच्या मूर्तीजवळ जाण्यामागचा हेतू काय होता, याचा तपास करावा, अशी मागणी करणारे निवेदन बजरंग दल, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि देवीभक्त यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दिले. (डॉ. भारत पाटणकर यांच्यावर कारवाईची मागणी करणारे बजरंग दल, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि देवीभक्त यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस निरीक्षक गुजर यांनी निवेदन स्वीकारल्यावर हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,

१. प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात गर्दी असते. डॉ. पाटणकर यांच्या स्टंटबाजीमुळे अनेक भाविक, महिला आणि लहान मुले यांना गर्दीमध्ये अडकून रहावे लागले.

२. मंदिरात दर्शन घेतल्यावर डॉ. पाटणकर यांनी पुजार्‍याला कपाळाला कुंकू लावतांना विरोध केला, प्रसाद नाकारला आणि मला हे पटत नसल्याचा उल्लेख केला. डॉ. पाटणकर यांना या गोष्टी पटत नसतांना ते मंदिरात कशासाठी आले होते ?

३. डॉ. पाटणकर यांनी मंदिरात प्रवेश करतांना त्यांनी कोणाचीही अनुमती न घेता खासगी ध्वनिचित्रक (कॅमेरा) घेऊन ध्वनिचित्रीकरण का केले, याचा तपास होणे आवश्यक आहे.

४. काही मासांपूर्वी पोलिसांनी आदेश दिला होता की, श्री महालक्ष्मी मंदिराच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणतेही आंदोलन केल्यास कडक कारवाई केली जाईल. असे असतांना देवस्थान समिती किंवा पोलीस यांनी स्वतःहून डॉ. पाटणकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावयास हवा होता. तसे झालेले नसल्यामुळे संघटनांच्या वतीने निवेदनपर तक्रार प्रविष्ट करत आहोत.

नास्तिकवाद्यांनी आमच्या मंदिराच्या कारभारात ढवळाढवळ करू नये ! – महेश उरसाल, शहरप्रमुख, बजरंग दल

डॉ. पाटणकर हे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी येथील शाहू परिसरात अवैधरित्या चालू असलेले नमाजपठण हिंदुत्वनिष्ठांनी कायदेशीर प्रक्रिया करून बंद पाडले. त्या वेळी डॉ. पाटणकर यांनी आम्ही कार्यकर्ते घेऊन त्या जागी नमाजपठण करू, तसेच सनातनचे आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करू, असे तेढ पसरवणारे वक्तव्य केले होते. कोम्बिंग ऑपरेशन हे केवळ पोलीसच करू शकतात, असे असतांना ते अशी वक्तव्ये कोणाच्या जीवावर करत असतात ? त्यांच्या मागे नक्षली हात आहे का ?

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, विश्‍व हिंदू परिषदेचे शहर सहमंत्री श्री. राजेंद्र सूर्यवंशी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाटे, हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहराध्यक्ष श्री. शरद माळी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अन् शिवसैनिक श्री. किशोर घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, भक्त सर्वश्री निखील कुलकर्णी आणि कृष्णा मेखाडे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *