भारतात पाश्चाात्त्यीकरण रोखण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाहीत, हे दुर्दैवी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : चीनमध्ये नाताळच्या आधीच एका विद्यापिठाने विद्यार्थ्यांना पाश्चात्त्यीकरणापासून दूर ठेवण्यासाठी नाताळवर बंदी घातली आहे. चीनच्या लिआओनिंग राज्यामधील शेनयांग फार्मास्युटिकल विद्यापिठाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की, नाताळसारखे पाश्चिमात्य सण साजरे करू नयेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनच्या कम्युनिस्ट युवा शाखेच्या युवकांनी म्हटले की, ‘हा निर्णय तरुण पिढीमध्ये सांस्कृतिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी घेतला गेला आहे. तरुण डोळे बंद करून पाश्चिमात्य सण साजरे करतात.
चीनमध्ये हे पहिल्यांदा झालेले नाही. चीनमध्ये याआधी देखील शैक्षणिक संस्थेने नाताळवर बंदी घातली आहे. चीनमध्ये असे समजले जाते की, पाश्चिमात्य किंवा परदेशी संस्कृती चीनच्या प्राचीन संस्कृतीला नष्ट करत आहे. (भारतातही असेच आहे आणि ते योग्य आहे. संस्कृतीरक्षणासाठी भारतातही असे प्रयत्न होतील, तो सुदिन ! यासाठी आता हिंदुत्वनिष्ठांनी पुढाकार घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात