ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि प्रबोधनपर फलक यांचे प्रदर्शन
इंदूर – येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि वितरण कक्ष उभारण्यात आला होता. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र, धर्माचरण, आचारधर्म, गोरक्षण, थोर क्रांतीकारक या विषयांवरील फ्लेक्सच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचसमवेत ध्वनीचित्रचकतीच्या माध्यमातून धर्माचरण या विषयावर प्रबोधन करण्यात आले. या प्रदर्शनाला जुना आखाडाचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी श्री अवधेशानंद गिरि महाराज, भानपुरा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य दिव्यानंद तीर्थ महाराज, बालयोगी पू. उमेशनाथ महाराज यांसमवेत या मेळ्याचे केंद्रीय मार्गदर्शक श्री. गुणवंतसिंह कोठारी यांनी भेट देऊन संस्था आणि समिती यांच्या कार्याची प्रशंसा केली. हा मेळा पहाण्यासाठी आलेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांना या वेळी संस्था आणि समिती यांच्या वतीने भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद् करणारे प्रदर्शन सविस्तर समजावून सांगण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात