Menu Close

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा खून करण्याची ख्रिस्त्याची पत्राद्वारे धमकी

स्वामी विवेकानंद यांचा ‘वेश्यापुत्र’ म्हणून उल्लेख

आश्रमातील साधिकांवर बलात्कार करण्याची दर्पोक्ती

  • सतत हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणून हिणवणारे कथित निधर्मीवादी आणि पुरोगामी ख्रिस्यांच्या धर्मांधतेविषयी बोलतील का ?
  • गोवा सरकारने याविषयी त्वरित अन्वेषण करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
  • हिंदूंचे प्रबोधन करून त्यांचा उत्कर्ष करणार्‍या हिंदु संतांचा धर्मांध ख्रिस्ती पराकोटीचा द्वेष करतात, याचे उदाहरण ! हिंदूंनो, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र झटणार्‍या संस्थेच्या अशी धमकी देणार्‍या धर्मांधांचा वैध मार्गाने निषेध करा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारवर दबाव आणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

फोंडा : जेम्स अण्णामलाई या ख्रिस्ती व्यक्तीने त्याच्या भ्रमणभाष क्रमांकासह सनातन संस्थेचे मुख्य कार्यालय असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांच्या नावे धमकीचे पत्र टपालाने पाठवले आहे. या पत्रामध्ये लिहिले आहे, ‘‘माझे नाव जेम्स अण्णामलाई आहे. मी बँगलोरचा आहे. मी हिंदूंचा आणि प्रामुख्याने स्वामी विवेकानंदांचा द्वेष करतो. स्वामी विवेकानंद हा वेश्येचा खूनी पुत्र होता. मी डॉ. आठवले यांना तुमच्या आश्रमात घुसून मारेन. तुमच्या आश्रमातील सर्व मुलींवर बलात्कार करेन आणि भारतामध्ये ख्रिश्‍चॅनिटी स्थापित करेन’’ (धर्मांध ख्रिस्ती नाव आणि भ्रमणभाष क्रमांकासह पत्र लिहून अशा प्रकारे सनातनला धमकी देतात. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

आतंकवादी मनोवृत्तीची व्यक्ती समाजहिताला घातक असल्याने तिच्यावर त्वरित कारवाई करा ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

सनातनच्या आश्रमात घुसून डॉ. आठवले यांचा खून करण्याची भाषा ही जेम्स अण्णामलाई यांची आतंकवादी मनोवृत्ती दर्शवते, तसेच आश्रमातील सर्व मुलींवर बलात्कार करण्याची भाषा ही त्यांच्यातील विकृत मानसिकताच दर्शवते. ते स्वामी विवेकानंद यांना ‘वेश्यापुत्र’ संबोधून हिंदु धर्म आणि स्वामी विवेकानंद यांविषयी पराकोटीचा द्वेष प्रगट करत आहेत. भारतात ख्रिश्‍चॅनिटी स्थापित करण्याचा त्यांचा उद्देश ही त्यांची धर्मांधता आहे. त्यामुळे अशी व्यक्ती समाजहिताला अत्यंत घातक असून तिच्यावर त्वरित कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आहे.

‘गोवा येथे २५ डिसेंबरपासून नाताळ सणाला मोठ्या प्रमाणात आरंभ होत आहे. त्याच्या आधी असे धमकीचे पत्र हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या आश्रमाला ख्रिस्त्यांकडून येते, हे कृत्य गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणारे आहे’, अशी प्रतिक्रिया श्री. राजहंस यांनी दिली.

या पत्राच्या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून या धर्मांध ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *