कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना टिळा लावणे, कुंकू लावणे, बांगड्या घालणे, चमकी घालणे, पैंजण घालणे आदी गोष्टी करण्यास विरोध केला जातो, याविषयी कोणतेही पुरो(अधो)गामी आणि निधर्मी बोलत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
आगरा : ज्या शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, अशा शाळांनी नाताळ साजरा करू नये, अशी चेतावणी हिंदु जागरण मंचने उत्तरप्रदेशातील अलीगडमधील शाळांना दिली आहे. हिंदु विद्यार्थ्यांना बळजोरीने नाताळ साजरा करायला लावणे म्हणजे इच्छेविरोधात धर्मांतर करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे, असे हिंदु जागरण मंचने म्हटले आहे.
१. हिंदु जागरण मंचाचे शहराध्यक्ष सोनू सविता यांनी सांगितले की, मिशनरी आणि खासगी शाळांमधील बहुतांश विद्यार्थी हिंदू असतात. या शाळांमध्ये ख्रिस्ती विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांच्या उत्त्पन्नाचा मुख्य स्त्रोत हिंदू विद्यार्थीच असतात.
ख्रिस्ती शाळांमध्ये नाताळच्या दिवसात हिंदु मुलांना खेळणी आणि भेटवस्तू आणण्यास सांगितले जाते. मुलांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्याची ही एक सोपी चाल आहे. याचा मुलांच्या मनावर परिणाम होत आहे. यामुळे आम्ही याविषयी पालकांशी बोलत आहोत.
२. कुणीही नाताळचा साजरा करण्याला आमचा विरोध नाही; मात्र खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांना या सणासाठी वर्गणी देण्याची बळजोरी करू नये. आम्ही शाळेचे मुख्याधापक आणि संचालक यांना यासंबधीचे लेखी निवेदन देऊ. त्यादृष्टीने आम्ही खासगी शाळांची सूची बनवायला प्रारंभ केला आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशातील हिंदू जनजागरण मंचाचे अध्यक्ष विजय बहादुर सिंह यांनी दिली.
३. मंचाचे राज्य सचिव संजू बजाज म्हणाले की, यासंदर्भात सर्व ख्रिस्ती शाळांना पत्र पाठवण्यात येणार आहे. जर शाळांनी आमच्या सूचनांचे पालन केले नाही, तर शाळेबाहेर विरोध प्रदर्शन करणार आहोत.
४. इनग्राहण इन्स्टिट्यूूटचे संचालक एस्.एन्. सिंह यांनी यास विरोध दर्शवला आहे. ‘कोणतीच शाळा सण साजरे करण्यासाठी विद्यार्थ्यांवर कधीही बळजोरी करत नाही; पण तरीही जर तशी सूचना मिळाली, तर आम्ही शासन आणि पोलीस यांच्याकडे सुरक्षा मागू; कारण नाताळ हा मोठा सण आहे’, असे सिंह म्हणाले. (भारतात केवळ २ टक्के ख्रिस्ती आहेत. त्यामुळे भारतात हा सण मोठा नाही, हे सिंह यांच्या लक्षात का येत नाही ? ख्रिस्ती देशांत किंवा इस्लामी देशांत दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात अन्य धर्मीय कधी साजरा करतात का ? हिंदु सहिष्णु आहेत; म्हणून त्यांच्यावर कोणतीही बळजोरी सहन करायची का? – संपादक)
५. हिंदु जागरण मंचाच्या या सूचना अजब असून यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे’, असे अधिवक्ता ऑसमंड चार्लस यांनी म्हटले आहे. (ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे आमिष दाखवून धर्मांतर करतात, त्यामुळे दोन धर्मांत प्रेम निर्माण होते, असे चार्लस यांना म्हणायचे आहे का ? याविरोधात ते का तोंड उघडत नाहीत ? – संपादक)
शाळांमधील बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांनी नाताळ का साजरा करायचा ?
अलिगडमध्ये शाळांमध्ये नाताळ साजरा करू नयेे, अशी चेतावणी दिल्याविषयी हिंदू संघटनांना दोषी ठरवणे अत्यंत चुकीचे आहे. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे शाळांमध्ये सरस्वतीपूजन आणि गणेशचतुर्थी साजरी करण्यास विरोध केला जातो; मग त्याच शाळांमध्ये नाताळ का साजरा करायचा ? आज भारतातील सर्व शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी बहुसंख्येने हिंदू असतात. या हिंदु विद्यार्थ्यांचा येशू अन् त्याचा नाताळ यांच्याशी काय संबंध ? देशातील धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी शाळांमध्ये नाताळ साजरा केला जाऊ नये, अशी हिंदु जनजागृती समितीचीही मागणी आहे.
आजकाल शाळांमध्ये नाताळाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांना काल्पनिक असलेल्या सांताक्लॉजच्या रूपात भेटवस्तू वाटल्या जातात. हे ख्रिस्ती पंथाचा प्रचार आणि विद्यार्थ्यांचे वैचारिक धर्मांतर करण्यासारखे आहे. आज शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि योग शिकवणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण, असा आरोप केला जातो. दुसरीकडे ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना टिळा लावणे, शिखा (शेंडी) ठेवणे, बांगड्या घालणे, मेंदी काढणे आदी हिंदु धर्माचरणावर बंदी घातली जाते. अशा परिस्थितीत शाळांमध्ये नाताळ साजरा करणे पूर्णतः अयोग्य आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात