Menu Close

अय्यप्पा स्वामींच्या पूजेच्या सिद्धतेच्या वेळी बेळगाव येथे धर्मांधांकडून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक विधींच्या वेळी कुरापती काढणार्‍या धर्मांधांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

बेळगाव : १९ डिसेंबर या दिवशी येथील चांदू गल्लीत पार पडणार्‍या अय्यप्पा स्वामींच्या पूजेची सिद्धता १८ डिसेंबर या दिवशी चालू असतांना रात्री ११ च्या सुमारास काही धर्मांधांनी पूजास्थळी दगडफेक गेली. त्याला हिंदूंनीही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर येथे पुन्हा दगडफेकीच्या आणि जाळपोळीच्या घटना घडून दंगल उसळली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही बाजूंकडील २३ जणांना अटक केली असून अद्यापही या भागात तणाव आहे.

या वेळी समाजकंटकांनी रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि छायाचित्रकही फोडण्यात आले. चांदू गल्ली, खडक गल्ली, जालगार गल्ली या भागांत ही दंगल पसरली होती. दंगलीची माहिती मिळाल्यानंतर अर्ध्या घंटाने पोलीस पोहोचल्यावर पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये २३ जणांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *