‘मध्यंतरी देशात काही ठिकाणी सेतू (पूल) कोसळल्यामुळे त्यांची लेखापरीक्षणे आणि माहिती वृत्तपत्रांतून आली. त्यातच काही वृत्तपत्रांतून महाराष्ट्रातील ब्रिटिशांनी बांधलेल्या सेतूंची महितीही वाचायला मिळाली.
‘याच महाराष्ट्रात जावळी खोर्यातील (वरंधा घाट) ‘पार’ गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला भक्कम दगडी बांधणीचा लांब-रुंद पूल आहे. चार कमानींच्या या पुलाची लांबी १६ मीटर, तर रुंदी ६ मीटर आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे सेतूनिर्माण आजही उत्तम अवस्थेत आहे. आज या पुलावरून बसगाड्या आणि ट्रक आदी वाहने बारा मास वाहतूक करतात. पुलांची वृत्ते देतांना वृत्तपत्रांनी या पुलाचीही नोंद घेऊन त्याचे छायाचित्र दिले असते, तर महाराष्ट्रातील तरुणांना तो सेतू पहाण्याची ओढ निर्माण झाली असती आणि इतिहास जागता झाला असता.’
– श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, सार्वजनिक पुणे सभा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात