Menu Close

लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या

मानखुर्द येथे शिवपुत्र युवा प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मजागृती सभा आणि शिवभक्त मेळावा

सभेला उपस्थित धर्माभिमानी आणि शिवभक्त

नवी मुंबई : लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ केवळ हिंदु मुलींपर्यंतच थांबत नसून हिंदु मुलेही याला बळी पडू लागली आहेत. अनेक हिंदु मुलांना मुसलमान मुलींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केले आणि नंतर त्यांना बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आले आहे. त्यामुळे लव्ह जिहादविषयी घराघरांत जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्यात्या कु. रसिका वरूडकर यांनी मानखुर्द येथे केले. शिवपुत्र युवा प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मजागृती सभा आणि शिवभक्त मेळावा महाराष्ट्रनगर, मानखुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. प्रसाद वडके, शिवसेना नगरसेविका सौ. ऋतुजा तारी, समाजसेवक श्री. हृदयनाथ तारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि प्रेरणामंत्र म्हणून सभेला प्रारंभ झाला. या सभेला २०० धर्मप्रेमी उपस्थित होते. या सभेसाठी श्री. किरण कदम, श्री. सुनील डांगरे आणि शिवपुत्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

कु. रसिका वरूडकर

या प्रसंगी कु. रसिका वरूडकर पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदु मुली किंवा मुले लव्ह जिहादला बळी पडण्याचे कारण म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. अन्य पंथीय त्यांच्या मुलांना धर्मशिक्षण देतात. हिंदु मुले मात्र आता ख्रिसमस आल्यावर लाचार होऊन त्यांच्या टोप्या घालून ख्रिस्ती सण साजरे करतील. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळेच युवकांनी आठवड्यातून किमान एक तास धर्मशिक्षणासाठी देणे आवश्यक आहे.’’

मार्गदर्शन करतांना श्री. प्रसाद वडके

श्री. प्रसाद वडके म्हणाले, ‘‘मंदिरांचे सरकारीकरण, देवतांचे विडंबन, राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचे विडंबन, धर्मांतर, बांगलादेशींची घुसखोरी, वाढता आतंकवाद आदी समस्या हिंदूंसमोर निर्माण झाल्या आहेत. त्यांवर पाय म्हणून सर्वांनी सतर्क राहून धर्मशिक्षित होणे आवश्यक आहे.’’

समाजसेवक हृदयनाथ तारी यांनी आपण सर्व भगव्याचे पाईक असल्याचे सांगून ‘हिंदुत्वाच्या या कार्यासाठी नेहमीच सहकार्य करत राहू’, असे आश्‍वासन दिले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पृथ्वीराज सरगर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वधाची माहिती पद्यपंक्तींत विषद केली. अन्य कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावर ३२ मण ‘सुवर्ण सिंहासन’ पुनर्स्थापित करण्याचे महत्त्व सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *