हद्दपारीची शिक्षा २ वर्षांसाठी ?
देहली पोलिसांची मोगलाई !
नवी देहली : दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांना २ वर्षांसाठी देहलीतून हद्दपार करण्याच्या कारवाईला प्रारंभ झाला असून त्यांना २५ फेब्रुवारीला अतिरिक्त पोलीस उपायुक्तांसमोर म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (देशात मोठ्या प्रमाणात देशद्रोही समोर आले असतांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून राष्ट्रवादी हिंदु नेत्यांवर कारवाई करणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
श्री. गुप्ता दक्षिण पूर्व जिल्ह्यातील सरिता विहार भागातील आली गावाचे निवासी असून त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये भादंवि, डीपी अॅक्ट, आर्पी अॅक्ट आणि पीआयएन्एच् अॅक्ट या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यामुळे दुसर्या समाजातील लोकांच्या मालमत्तेला हानी पोहोचू शकते, हे लक्षात घेऊन गुप्ता यांच्या विरोधात ४७ डीपी अॅक्टच्या अंतर्गत कारवाई चालू करण्यात आली आहे.
त्यानुसार त्यांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये २ वर्षासाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. या संदर्भातील माहितीला दुजोरा देतांना, अतिरिक्त पोलीस उपायुक्त विजय सिंह यांनी गुप्ता यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असून हद्दपारीच्या कारवाईला वेळ लागेल, असे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात