Menu Close

नियम धाब्यावर बसवणार्‍या आणि महसूलबुडव्या सनबर्न फेस्टिव्हलला सरकारच्या पायघड्या का ? – हिंदु जनजागृती समिती

सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारणार ! – पराग गोखले

डावीकडून श्री. सचिन दगडे, श्री. चंद्रकांत वारघडे, श्री. पराग गोखले, श्री. किरण दगडे, सौ. पियुषा दगडे, सौ. वैशाली दगडे आणि सौ. कल्पना घुले

पुणे – पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थांचा आणि संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे गावात होऊ घातला आहे. गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलच्या वेळी आयोजकांनी सरकारचे अनेक नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे वनविभागाने आयोजकांच्या विरोधात ३ गुन्हेही नोंदवले होते. असे असतांना सरकारची फसवणूक आणि करचुकवेगिरी करणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला राज्य सरकारच्या पायघड्या का ? जनभावनांकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम होऊ दिला जात असल्याने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ग्रामस्थ या विरोधात संस्कृतीरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारतील, अशी चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. २० डिसेंबरला हायक्लास रेसिडेन्सीच्या क्लब हाऊसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, भाजपचे विद्यमान नगरसेवक श्री. किरण दगडे, बावधनच्या सरपंच सौ. पियुषा दगडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेश्मा दगडे, श्री. सचिन दगडे, सौ. कल्पना घुले, सौ. वैशाली दगडे, श्री. सचिन दगडे, श्री. आझाद दगडे, श्री. महेश घुले उपस्थित होते.

दुर्घटना घडल्यास त्याचे दायित्व कुणाचे ? – पराग गोखले

लवळे येथे सनबर्न फेस्टिव्हल ज्या ठिकाणी होऊ घातला आहे, त्या ठिकाणापासून जवळच सिंबॉयसिस, भारती विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्था आहेत. भारताच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत असलेली एच्इएम्आर्एल् ही संस्था लवळे परिसरात आहे. तेथे हायली एक्स्प्लोझिव्ह मटेरियलची चाचणी केली जाते. मागच्या वर्षी सनबर्न फेस्टिव्हलच्या व्यासपिठाला कार्यक्रम संपल्यानंतर आग लागली होती. जर यंदाही या ठिकाणी कुठली दुर्घटना घडली, तर त्याचे दायित्व कुणाचे ? लोहगाव पोलिसांनीही सुरक्षिततेच्या कारणास्तव अनुमती नाकारली असतांना लवळे येथे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम का होऊ दिला जात आहे ?

सनबर्न फेस्टिव्हलच्या ठिकाणी एकही गाडी जाऊ देणार नाही ! – श्री. किरण दगडे

सनबर्न फेस्टिव्हल हा पुण्याच्या संस्कृतीला पूरक नसून यापूर्वी गोव्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे तरुण मुलीचा मृत्यू झाला होता. बावधनमध्ये वारकरी विचारांचे लोक रहातात. ग्रामस्थांचा कार्यक्रमाला विरोध असून फेस्टिव्हलच्या ठिकाणी आम्ही एकही गाडी जाऊ देणार नाही.

गुन्हेगारांना पुन्हा गुन्हा करण्यास अनुमती देणे, ही कुठली लोकशाही ? – श्री. चंद्रकांत वारघडे

मागच्या वर्षी केसनंद येथे झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये आयोजकांनी अवैधरित्या उत्खनन केले, वृक्षतोड केली, वनविभागाच्या भूमीतून रस्ता तयार केला. वनविभागाने या संदर्भात १९ डिसेंबर २०१६ या दिवशी आयोजकांवर गुन्हा नोंदवला; मात्र त्यांनी केलेला रस्ता १ जानेवारी २०१७ या दिवशी उखडला. गुन्हा केल्याचे उघडकीस आल्यानंतर लगेचच त्यावर अ‍ॅक्शन (कारवाई) का घेतली गेली नाही ? ५२ सहस्र रुपयांची तिकीटविक्री लपवून ठेवत आयोजकांनी सरकारचा कर बुडवला. ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा असतांना ४०० डेसिबल एवढा मोठा आवाज कार्यक्रमात होता. मागच्या वर्षी या कार्यक्रमासाठी ५०० पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध करून दिला होता. मद्यपींच्या संरक्षणासाठी पोलिसांची फौज उपलब्ध करून दिली जाते; मात्र शेतकर्‍यांच्या शेताची मोजणी करायची असेल, तर पोलीस उपलब्ध होण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागते. हा कुठल्या न्याय ? जर सरकारला पर्यटनवाढ करायचीच असेल, तर अन्य चांगले पर्याय उपलब्ध आहेत. युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणार्‍या फेस्टिव्हलला प्रोत्साहन का ? गुन्हेगारांनी गुन्हा करूनही पुन्हा गुन्हा करण्यास अनुमती देणे, ही कुठली लोकशाही ? या संदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

१. सांस्कृतिक पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांची आवश्यकताच नाही ! – सौ. पियुषा दगडे, सरपंच, बावधन

२. हा कार्यक्रम म्हणजे भावी पिढी बर्बाद (उद्ध्वस्त) करण्याचे षड्यंत्र आहे ! – श्री. भाऊ केदारी, माजी सरपंच, लवळे

३. आम्हाला अटक झाली, तरी चालेल; पण या सनबर्न फेस्टिव्हलला आम्ही विरोध करू. सरकारने या कार्यक्रमाला मान्यता दिल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम उधळून लावू ! – सौ. रेश्मा दगडे

पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे २ पोलीस उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *