योगशिक्षणाला नाहक विरोध करणारे भारतातील मुसलमान हे लक्षात घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये योगासनांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. उद्यानांमध्ये सकाळच्या वेळी अनेक जण योगासने करतांना दिसत आहेत. पाकमध्ये काही ठिकाणी योग शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. यात महिलाही सहभागी होत आहेत. गेल्या ३ वर्षांपासून पाकमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.
१. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बीना शाह यांच्या लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार वर्ष १९८० मध्ये पाकमध्ये योगासनांचा प्रारंभ झाला. प्रा. मोईज हुसेन यांनी मुंबईत योगासनांचे शिक्षण घेऊन त्यांनी कराचीमध्ये योग शिकवणारा वर्ग चालू केला होता. या वर्गांना मानसिक आणि शारीरिक दृष्टीने सक्षम रहाण्यासाठी अनेक महिला येत होत्या.
२. यानंतर ‘योग शरिराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे’, अशा प्रकारे प्रचार केला जाऊ लागला. वर्ष १९९० च्या दशकामध्ये दूरचित्रवाहिन्यांवरून सकाळी योगासनांचे प्रकार दाखवण्यात येऊ लागले. यातून योगासनांचे लाभ सांगण्यात येऊ लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी योगशिबिरांचे आयोजन होऊ लागले. त्यात इस्लामी प्रार्थना पद्धत आणि आसने यांतील समानता सांगण्यात येऊ लागली. विशेषतः सूर्यनमस्काराच्या संदर्भात ते अधिक स्पष्टपणे सांगण्यात येऊ लागले. यामुळे अनेक जण योगासनांकडे वळले.
३. पाकमध्ये शमशाद हैदर हे मोठ्या प्रमाणावर योगाचे शिक्षण देतात. पाकच्या पंजाब प्रांतामध्ये त्यांचे ५० वर्ग चालू आहेत. याव्यतिरिक्त अनेक तरुण भारत, थायलंड, इंडोनेशिया, ब्रिटन आदी देशांतून योगासनांचे शिक्षण घेऊन आले आहेत आणि ते पाकमध्ये वर्ग घेत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात