मुंबई : छत्रपति शिवरायांचे चरित्र मुलांमध्ये आतापासून रुजावेत यासाठी १९ फेब्रुवारीला ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला कोपरखैरणे येथील मॉर्डन शाळेत शिकणारा इयत्ता १० वीतील विद्यार्थी कु. समाधान जाधव आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवराय आणि त्यांचे चरित्र या विषयावर संबोधित केले.
या वेळी कु. समाधान याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे महाराजांचे चरित्र मांडले. कु. समाधानने सांगितले की, महाराजांकडे जसे निष्ठावंत मावळे होते, तसे आज नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. इतर देश महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब करत आहेत, तेथे महाराजांचा इतिहास शिकवला जात आहे; मात्र आमचे ऐवढे दुर्दैव की, आमच्या राज्यकर्त्यांना आमच्या राजाचे अजिबात मोल नाही.
त्याचप्रमाणे श्री. खानविलकर म्हणाले की, मुलांनीही अभ्यासाच्या वेळी गणपति आणि सरस्वती देवीला प्रार्थना करून अभ्यास केला, तर महाराजांना जसे देवाचे साहाय्य मिळत होते, त्याचप्रमाणे आम्हाला ही देव साहाय्य करणारच आहे. या वेळी इयत्ता ४ थी ते ७ वीचे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून ३५० हून अधिक जण उपस्थित होते.
क्षणचित्र – शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांची भाषणे, पोवाडे मोठ्या उत्साहात सादर केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात