ग्रामस्थांकडून दवंडी पिटवून हिंदु जनजागृती सभेचे निमंत्रण !
पेण : येथील वडखळ गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने आदल्या दिवशी सभेचे निमंत्रण देण्यासाठी दवंडी पिटवण्यात आली. गावातील १८० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते. या वेळी समितीच्या वतीने आधुनिक वैद्य उदय धुरी आणि सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सभेच्या आयोजनासाठी, तसेच भोजन, निवास व्यवस्थेसाठी पेण पंचायत समितीचे सदस्य श्री. राजेश मोकल, डोलवी येथील सरपंच सौ. वनिता म्हात्रे, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ज्योतिषाचार्य श्री. मारुति म्हात्रे, मंदिर विश्वस्त श्री. बळीराम म्हात्रे, सौ. पुष्पा म्हात्रे यांनी साहाय्य केले. सभेनंतर १९ डिसेंबरला येथील हनुमान मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
क्षणचित्र
‘फेसबूक लाईव्ह’द्वारे केलेल्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून ८ सहस्रांहून अधिक जणांपर्यंत सभेचा विषय पोहोचला आणि १६०० हून अधिक जणांनी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात