Menu Close

निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे शिववंदनेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून आक्रमण आणि दगडफेक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अपमान करण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे आणि महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणे, हे शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

निगडी (पिंपरी-चिंचवड) : निगडी परिसरातील ओटा स्कीम परिसरात २० डिसेंबरला शिववंदनेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी धारदार शस्त्रांनी आक्रमण केले आणि दगडफेक केली. यात बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) प्रविष्ट केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. २० डिसेंबरला दुपारी येथील आझाद चौकात लावलेल्या अनेक फलकांपैकी केवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला फलक पालिकेकडून काढण्यात आला. त्यानंतर त्या परिसरातील धर्मांधांनी फटाके फोडले.

सायंकाळी फलक पुन्हा बसवून शिववंदना घेण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या परिसरात गेल्यावर १०० हून अधिक धर्मांधांनी अचानक आक्रमण केले. या वेळी एका कार्यकर्त्याच्या हातातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खाली पडल्यावर धर्मांधांनी त्या मूर्तीला लाथा मारल्या. (अशा प्रकारे आक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणारे धर्मांध म्हणजे औरंगजेबाची वंशावळच होय ! ही परिस्थिती पालटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे असणारे हिंदु राष्ट्र (ईश्‍वरी राज्य) स्थापन करण्याविना पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदूंमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आक्रमण करणार्‍या धर्मांधांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे समजते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *