कारवाई केवळ मंदिरांवरच का ? – समस्त हिंदु संघटनांचा महापालिकेला प्रश्न
भिवंडी (ठाणे) : महापालिकेच्या कर्मचार्यांनी चुकीचे सर्वेक्षण करून अधिकृत मंदिरांवर निष्कासन कारवाई चालू केली आहे. ही कारवाई मंदिरांवरच का ?, असा संतप्त प्रश्न हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांना घेराव घालून विचारला.
१. सर्वोच्च न्यायालयचा आदेश आल्याने पालिकेतील अधिकार्यांनी बैठक घेऊन शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
२. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र पालिका प्रशासनाने केवळ मंदिरांवरच कारवाई चालू केली आहे.
३. संतप्त झालेल्या शिवसेना, भाजप, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ६ मंदिरांवर केलेल्या निष्कासन कारवाईविषयी खडसावले.
४. या वेळी शिवसेनेचे गटनेते संजयभाई म्हात्रे, भाजपचे नगरसेवक प्रकाश टावरे, बजरंग दलचे शहराध्यक्ष राहुल जूकर, जिल्हाध्यक्ष दादा गोसावी, माजी नगरसेवक दत्ता पवार, महेश जगताप, मनोज रायचा, सुरज केशरवाणी, पंकज गुप्ता आदींसह हिंदु संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात