लक्झम्बर्ग (युरोप) : भारतीय सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाकवर ६ मासांची स्थगिती दिली असतांना आणि याला केंद्र सरकार गुन्हा ठरवत असतांना आता युरोपीय देशांमध्येही याला अवैध ठरवण्यात आले आहे.
युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या एका सुनावणीच्या वेळी शरीया कायद्यानुसार झालेला तलाक वैध मानण्यास नकार दिला. युरोपीय महासंघ, रोम रेग्युलेशन आणि जर्मन कायदा यांत अशी कोणतीही तरतूद नसल्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले. जर्मनीत वास्तव्याला असणार्या सिरीयाच्या एका जोडप्याच्या घटस्फोटाचे प्रकरण युरोपीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावणीसाठी आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात