‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणार्या ‘रेड सिग्नल’ या गुजराती भाषेतील ग्रंथाचे भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर : ‘लव्ह जिहाद’रूपी छुपे आक्रमण रोखण्यासाठी हिंदु माता भगिनींनी, तसेच हिंदु समाजाने सज्ज झाले पाहिजे. यासाठी ‘लव्ह जिहाद’ या विषयावरील हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘रेड सिग्नल’ या नावाने गुजराती भाषेतील दुसर्या ग्रंथाचे प्रकाशन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मुंबईतील आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ईश्वर भवन, क्वेटा कॉलनी, नागपूर येथे करण्यात आले. श्री. लोढा यांनी ‘प्रत्येकाने ‘रेड सिग्नल’ हे पुस्तक वाचले पाहिजे’, असे सांगितले. या वेळी नागपूर येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर उपस्थित होते. या वेळी समितीचे श्री. अजय संभूस यांनी ‘लव्ह जिहाद’विषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी गुजराती समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी श्री. मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले, ‘‘मी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातून आलो आहे. तेथे लव्ह जिहादच्या विरोधात मोठे काम करावे लागणार आहे. प्रत्येक गल्लीमधून कोणत्या ना कोणत्या मुलीला पळवून नेले जात आहे. देशभरात लव्ह जिहादची समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. लव्ह जिहादपासून आपल्या परिवाराचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. लव्ह जिहादपासून कसे सुरक्षित रहावे, या घटना न्यून कशा कराव्यात, यासाठी प्रत्येकाने ‘रेड सिग्नल’ हे पुस्तक वाचले पाहिजे. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्यात सहभागी झाले पाहिजे.
या कार्यक्रमाविषयी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की,
१. गेल्या काही मासांत राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ हा विषय सतत चर्चेत आहे. राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव असो कि मुझफ्फरनगर दंगलीस कारणीभूत ठरलेला आंतरधर्मीय विवाह असो, ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविरुद्ध चालू असलेले अघोषित युद्धच आहे. ‘लव्ह जिहाद’ने सध्या भारतातील बहुतांश राज्यांत उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे ही हिंदूंसाठी राष्ट्रीय समस्या बनली आहे.
२. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती वर्ष २००६ पासून हिंदु समाजात जनजागृती करत आहे. यापूर्वी समितीने ‘लव्ह जिहाद’ या नावाने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम, ओडिया, बंगाली, आसामी आणि इंग्रजी आदी भाषांमध्ये आतापर्यंत ३ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित केल्या आहेत.
३. ‘रेड सिग्नल’ या ग्रंथात ‘लव्ह जिहादद्वारे जिहादी धर्मांध हे मुसलमानेतर म्हणजेच हिंदु, जैन, शीख, ख्रिस्ती, बौद्ध मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसे ओढतात, त्यांच्यावर कसे अत्याचार करतात, तसेच पुढे कसे वेश्याव्यवसायात ढकलतात, विदेशात विकतात, आतंकवादी कारवायांसाठीही वापर करतात’, हे सोदाहरण दिले आहे.
हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘रेड सिग्नल’ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध
‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र हिंदु समाजाच्या लक्षात यावे आणि तो त्याला प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावा, या उद्देशाने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. ६५ रुपये अर्पणमूल्य असलेला ‘रेड सिग्नल’ हा ग्रंथ, तसेच ‘लव्ह जिहाद’विषयीचे विविध भाषांतील ग्रंथ www.SanatanShop.com या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिंदू जागृतीसाठी या ग्रंथांचा हिंदु बांधवांनी लाभ घ्यावा आणि ग्रंथासाठी ९८६७८५७७३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात