राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची जिज्ञासूंची इच्छा
चेन्नई : हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेण्याची इच्छा असलेल्या समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या सदस्यांसाठी समितीच्या वतीने १५ डिसेंबर २०१७ या दिवशी अरुंबक्कम, चेन्नई येथील कोला पेरुमल शाळेमध्ये एक बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीला संबोधित करतांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व आणि आवश्यकता’ याविषयी माहिती दिली, तसेच हिंदु राष्ट्राचे महत्त्व विषद करणार्या काही ध्वनीचित्रफिती आणि दृश्यपट दाखवण्यात आले. सर्व सदस्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याविषयी इच्छा व्यक्त केली. या वेळी तमिळनाडूच्या ‘हिंदु हेल्पलाईन’चे समन्वयक श्री. सतीश उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक शानबाग यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सर्व जण सनातन प्रभात नियतकालिकाचे वर्गणीदारही झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात