धुळे : हिंदु जनजागृती समितीने २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेविषयी येथील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रमुख वक्ता प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह हे काय बोलतील, यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
प्रसाराच्या वेळी वैशिष्ट्यपूर्ण अनुभव
१. येथील द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. बापूजी शेलार यांनी पुढाकार घेऊन १५ गावांमध्ये सभेनिमित्त बैठका घेऊन प्रचार केला.
२. काही ठिकाणी बैठकांनंतर धर्मप्रेमी युवकांनी लगेचच धर्मकार्यात वेळ देण्यास प्रारंभ केला, तसेच सेवांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
३. शांतीनगर, रामनगर या भागांत बैठकीच्या वेळी धर्मप्रेमी युवकांनी मोठ्या संख्येने दिवे लावून रोषणाई केली होते. प्रभु श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने बैठकीला आरंभ करण्यात आला.
४. गोकुळनगर परिसरात झालेल्या बैठकीच्या वेळी एका युवकाने त्याचा वाढदिवस पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची सिद्धता केली होती; पण बैठकीत समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सांगितलेले हिंदु संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व ऐकून त्याने हिंदु पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
५. ग्रामीण भागात झालेल्या एका बैठकीत सभेचा विषय ऐकून प्रभावित झालेल्या एका धर्मप्रेमीने सभेच्या प्रचारासाठी बॅनर छापून ते लावण्याचेही नियोजन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात