Menu Close

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – आमदार भरतशेठ गोगावले

नागपूर : मुंबईसह महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मुंबईतील डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडशेन’ संस्थेच्या कल्याण येथून अटक केलेल्या रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या कार्यकर्त्यांनी अनुमाने ८०० जणांचे फसवून आणि प्रलोभन देऊन धर्मातर केले होते, असे आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे. या धर्मांतरितांना आयएस्आयएस् या आंतरराष्ट्र्रीय आतंकवादी संघटनेत भरती करण्याचा त्यांचे षड्यंत्र होते, असा संशय आहे. महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींची धर्मांतर केली जात असतात. सावरकरांनी यापूर्वीच सांगून ठेवले आहे की, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्वरित धर्मांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी २२ डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडताना केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *