पाकमधील शिखांच्या बळजोरीने होणार्या धर्मांतरावर पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री आवाज उठवून केंद्र सरकारला कृती करण्यास भाग पाडतात, मात्र देशातील एकही हिंदु मुख्यमंत्री, मंत्री किंवा बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांचे प्रमुख तेथील हिंदूंविषयी आवाज उठवून सरकारला कृती करण्यास सांगत नाहीत !
कराची – पाकच्या सिंध प्रांतात काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिच्यावर मुसलमान व्यक्तीशी लग्न करण्याचा दबाव टाकण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
१. थार गावातील या पीडित मुलीच्या घरात काही दिवसांपूर्वी अपहरणकर्ते घुसले आणि त्यांनी तिच्या कुटुंबाला ओलीस ठेवले. त्यानंतर त्या १४ वर्षाच्या तरुणीचे अपहरण केले.
२. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील हीरो मेघवार यांनी तात्काळ काही बड्या लोकांशी संपर्क केला; मात्र ‘तुमच्या मुलीने धर्मांतर केले असून नसीर लुन्जो नावाच्या व्यक्तीशी तिचा विवाह झाल्याने आता काही करू शकत नाही’, असे या लोकांनी सांगितले.
३. या पीडित मुलीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांना माहिती दिल्यानंतरही त्यांनी अपहरणकर्त्यांचा तपास घेण्याचा प्रयत्न केला नाही. (भारतातील पोलीस आणि पाकमधील पोलीस एकाच माळेचे मणी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आमच्या मुलीचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि तिचे धर्मांतर झाले असेल, तर न्यायालयात तिला सादर करावे, अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे.
४. थारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमीर सौद मागसी म्हणाले, ‘‘आम्ही आता तक्रार दाखल करून घेतली असून ३ संशयितांची चौकशी करत आहोत. मुलीच्या धर्मपरिवर्तनाविषयी आम्हाला एक प्रमाणपत्र मिळाले आहे.’’
५. विवाहित जोडप्याने देखील सिंध उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करून सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. १७ जानेवारीला त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात