करावे गाव (नेरूळ) येथील व्याख्यानास धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
नेरूळ : हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे. हिंदु पद्धतीनुसार धर्माचरण केल्यानेच आपली उन्नती होऊन तीच हिंदु राष्ट्राची पहाट असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी केले. श्री नागदेवी मंदिर, करावे येथे ‘हिंदु धर्म, धर्माचरण, हिंदु राष्ट्र’ या विषयांवर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.
कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे साहाय्य करणार्यांचे, तसेच येथे उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी होणार्या सर्व धर्मप्रेमींचे श्री. नीलेश देशमुख यांनी आभार मानले अणि कार्यक्रमाची सांगता हिंदु राष्ट्राच्या प्रार्थनेने झाली.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. सौ. सुप्रिया सातपुते : हिंदु धर्मच आयुष्याला परिपूर्णता देऊ शकतो.
२. श्री. जयवंत तांडेल : धर्मशिक्षण वर्गाची आमच्या गावात पुष्कळ आवश्यकता आहे. भाजप सीवुड्स मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या कार्यास शुभेच्छा !
३. श्री. गोंविंदजी दुबे : मी हिंदी भाषिक असून मला मराठी येत नाही, तरीही मी दैनिक सनातन प्रभातचा वर्गणीदार आहे; कारण मला ठाऊक आहे की, माझे अर्पण धर्मकार्यासाठीच आहे !
आढावा बैठक !
पुढील कार्याच्या नियोजनासाठी श्री नागदेवी मंदिरातच २८ डिसेंबरला संध्याकाळी ७.३० वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात