नवी मुंबई : आज महाराष्ट्रात न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून सर्वच महानगरपालिकांत हिंदूंच्या मंदिरांना अनधिकृत ठरवून पाडले जात आहेत. याउलट अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना हात लावण्याचे धैर्य मात्र प्रशासन दाखवत नाही. हा देश प्रथम हिंदूंचा आहे. येथील मंदिरांचे रक्षण करण्याचे दायित्व आपले असून हिंदूंनी त्यासाठी एकत्रित यावे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ घेतला.
क्षणचित्र
श्री स्वामी समर्थ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष सुतार यांनी समितीच्या धर्मसभेचे कौतुक केले. त्यांनी ‘अशा सभा तसेच धर्म, आणि अध्यात्माची बाजू मांडणारे वक्ते अधिक असावेत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात