चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नई येथे नुकतेच हिंदुत्वनिष्ठांसाठी एक दिवसीय शिबीर घेण्यात आले होते. चेन्नईमध्ये साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचा निर्णय या शिबिरामध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार अण्णानगर येथील श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात १७ डिसेंबरपासून साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी या धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनीही या धर्मशिक्षणवर्गात हिंदु राष्ट्राचे महत्त्व विशद केले. तमिळ पंचांगानुसार १७ डिसेंबर या दिवशी हनुमान जयंती असल्याने धर्मशिक्षणवर्गात श्री हनुमानाची शक्ती कार्यरत असल्याची अनुभूती अनेकांना आली. या धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित असलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. डनलप कुमार यांनी मूर्तीपूजेचे महत्त्व सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात