छोट्या बेटांचा समूह असणारा देशही भारताला डोळे वटारून दाखवतो यावरून भारताचे परराष्ट्र धोरण किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : भारताच्या दक्षिणेला केरळपासून जवळ अरबी समुद्रात लहान बेटांचा इस्लामी देश असणार्या मालदीवमधील एका दैनिकाच्या संपादकीयमधून भारताला मालदीवचा सर्वांत मोठा शत्रू म्हटले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानविरोधी आहेत, असाही यात आरोप करण्यात आला आहे. स्थानिक भाषा धिवेहीमधून प्रकाशित होणारे हे दैनिक राष्ट्रपती अब्दुल्ला यमीन यांचे मुखपत्र आहे. यात पुढे चीनला मालदीवचा नवा आणि चांगला मित्र म्हटले आहे. (चीन डावपेचामध्ये भारतापेक्षा कितीतरी पटींनी हुशार आहे, हेच यावरून दिसून येते ! भारताला चारही बाजूंनी घेरण्याचा चीनचा प्रयत्न भारतीय शासनकर्त्यांनी शिकायला हवा. भारताच्या पंतप्रधानांनी विदेश दौरे करण्यापेक्षा अशा पद्धतीचे डावपेच रचणे महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर भारताचा खरा मित्र कोणीही नाही, हे भारताच्या पराराष्ट्र नीतीचे सर्वांत मोठे अपयश आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या संपादकीयमधून भारतावर टीका केली असल्याने मालदीवच्या राजकारणामध्ये वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाने म्हटले आहे की, राष्ट्रपती अब्दुल्ला यांच्या संमतीनंतरच हे संपादकीय प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिक पार्टीचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती यमीन यांच्या या धोरणानंतर भारताने सतर्क व्हायला हवे. पक्षाचे नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री अहमद नसीम यांनी भारतातील एका दैनिकाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले की, हा लेख चीनला खुश करण्यासाठी लिहिण्यात आला आहे; मात्र ते भारत आणि मालदीव या दोन्ही देशांसाठी चांगले नाही. भारताशी चांगले संबंध ठेवणेच दोन्ही देशांच्या हिताचे आहे.
२. या संपादकीयमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, भारत आणि श्रीलंका मालदीवमध्ये यमीन यांचे सरकार पाडण्याचा कट रचत आहेत. तसेच या लेखातून भारतावर काश्मीर आणि श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
३. वास्तविक चीन मालदीवला स्वतःकडे वळवून हिंदी महासागरातील बेटांच्या समुहांना त्याच्या लाभासाठी वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या मालदीव सरकारने चीनला साहाय्य करून ते भारतविरोधी असल्याचे सिद्ध केले आहे.
४. काही दिवसांपूर्वी मालदीव सरकारने देशातील ३ नगरसेवकांनी भारताच्या राजदूतांची भेट घेतल्यावर त्यांना निलंबित केले होते. (एक छोटासा बेटांचा देशही बलाढ्य भारताच्या विरोधात अशी कृती करण्यास धजावतो, तर भारत सरकार देशातील फुटीरतावाद्यांवर, देशद्रोह्यांवरही कारवाई करत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात