गरोठ (मध्यप्रदेश) : मंदसौर येथील गरोड येथील श्री महाराणा युवा संघटनेच्या वतीने प्रतिमाह होणार्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. आनंद जाखोटिया यांनी संघटनेच्या उपस्थित कार्यकर्त्यांना हिंदु धर्माची सद्यःस्थिती आणि संघटनेचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय त्यांना हिंदु राष्ट्राविषयीच्या प्रदर्शनाद्वारे विषय स्पष्ट केला. या वेळी १०० हून अधिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात