वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौकात २० डिसेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, वायूप्रदूषण करणार्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन न करता नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, जम्मू-काश्मीर येथील सैन्यावर दगडफेक करणार्यांवरील गुन्हे मागे घेऊ नयेत, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. आंदोलनानंतर १२५ स्वाक्षर्यांचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
क्षणचित्र
स्थानिक ३ दूरचित्रवाहिन्यांकडून आंदोलनाचे चित्रीकरण करण्यात आले, तसेच त्यांनी छोटी मुलाखतही (बाईट) घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात