Menu Close

सोलापूर येथे पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांवर अमानुष लाठीमार

अन्य धर्मियांच्या मिरवणुकीत पोलिसांनी असे केले असते का ?

सोलापूर : येथे शिवजयंतीनिमित्त डॉल्बी कंटेनर वापरणार्‍या मंडळातील हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अर्चना गीते, साहाय्यक पोलीस आयुक्त महिपती इंदलकर यांचा सहभाग होता. (निरपराध हिंदूंवर लाठीमार करणार्‍या या पोलिसांवर कठोरात कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी मिरवणुकीत कंटेनर आणि डॉल्बी वापरलेल्या शिवजयंती उत्सव मंडळांवर कारवाई करा, असा आदेश पोलीस आयुक्तालयात बसून रात्री ११.३० पासून देण्यास प्रारंभ केला. (असा आदेश अन्य धर्मियांच्या संदर्भातही पोलीस देतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर फटाके फोडल्याचे निमित्त करून पोलीस अधिकार्‍यांनी व्यासपिठावर बसलेल्या शिवजन्मोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना पुष्कळ मारहाण केली.

२. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कंटेनरचालकांकडून चाव्या काढून घेतल्या. डॉल्बी यंत्रणा कह्यात घेतली. शिवाजी चौक परिसरात रात्री लाठीमार करावा, अशी परिस्थिती नसतांनाही पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे पोलिसांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी तेथे आंदोलन करण्यात आले; मात्र जुजबी उत्तरे देऊन पोलिसांनी वेळ मारून नेली.

३. दुसर्‍या दिवशी सोलापुरातील १५० हून अधिक शिवभक्तांवर डॉल्बी आणि कंटेनर यांचा वापर केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.

४. लाठीमार करणार्‍या पोलिसांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित करून या मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *