Menu Close

चित्रपटात जोसेफ, मरियम, महंमद, आयशा, अशी नावे का ठेवत नाहीत ? – हिंदू जागरण मंच

बंगाली चित्रपटात राम, सीता अशी नावे ठेवण्याला हिंदू जागरण मंचचा विरोध

कोलकाता : बंगाली चित्रपट रॉन्गबिरोन्गेर कोरही यामधील भूमिका करणार्‍यांची नावे सीता, राम ठेवण्यात आली असून शेवटी ते एकमेकांपासून वेगळे होतात, असे दाखवण्यात आले आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून मिळाल्यावर या चित्रपटाला हिंदू जागरण मंचने विरोध केला आहे. चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांतून मरियम, महंमद, आयशा अशी नावे का ठेवत नाहीत ? धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी मंचने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे  केली आहे.

हिंदू जागरण मंचचे बंगाल शाखेचे प्रवक्ता विवेक सिंह यांनी म्हटले की, याविषयी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिण्यात आले आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित नाही, तर त्यातील भूमिकांना राम, सीता अशी नावे ठेवायला नको. चित्रपटात या दोघांना वेगळे होतात, असे दाखवणे हा जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे. दिग्दर्शकाने भूमिकांची नावे पालटून चित्रपट प्रदर्शित करावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *