संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे मत
आतंकवाद्यांना आश्रय देणार्यांना स्वतः नष्ट करण्याचे धाडस न दाखवणार्या भारताला इतरांना असे सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संयुक्त राष्ट्र : आतंकवाद्यांना आश्रय देणार्यांना नष्ट केले पाहिजे. तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या समर्थकांना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे मत भारताचे प्रतिनिधी तन्मय लाल यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्यक्त केले आहे.
तन्मय लाल म्हणाले, आतंकवादी हे रुग्णालयातील रुग्ण, शाळेतील लहान मुले आणि मशिदीत प्रार्थनेसाठी आलेले लोक यांना लक्ष्य करू लागले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय चिंताजनक बनवली आहे. आतंकवाद्यांना सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देणार्या देशांवर प्रतिबंध लावण्याची वेळ आली आहे. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानचे राजदूत महंमद सैकल म्हणाले, पाकिस्तानकडून डुरंड सीमेवरून सातत्याने उल्लंघन केले जाते. त्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला जातो. सीमेवरील असंख्य निष्पाप गावकर्यांना प्राण गमवावे लागलेे आहेत. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी समर्थ आहोत. आमच्या संयमाची आणखी परीक्षा पाहू नका.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात