सभेमुळे तरुणांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पक्के झाले !
डायघर (जिल्हा ठाणे) : छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे. गावातील हिंदू एकत्र आले अन् धर्मशिक्षण घेऊन सनदशीर मार्गाने धर्मावरील आघात रोखण्यासाठी कृतीप्रवण झाले, तर उत्तरशिव हे गाव हिंदु राष्ट्रातील एक गाव म्हणून ओळखले जाईल. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येकाला धर्मशिक्षण, संघटन आणि संघर्ष आत्यंतिक आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. येथील उत्तरशिव गावात २४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते. ‘सभेमुळे उत्साह येऊन आमचे हिंदु राष्ट्राचे ध्येय पक्के झाले’, असे तरुणांनी सांगितले. १७० धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.
पोलिसांकडून आयोजकांची चौकशी
सभेच्या ठिकाणी पोलिसांनी येऊन आयोजकांची चौकशी केली. (सनदशीर मार्गाने घेण्यात येणार्या हिंदूंच्या सभांची चौकशी करण्यात वेळ घालवणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
क्षणचित्रे
१. सभेला महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेचा प्रसार आणि आयोजनात गावातील तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला.
२. प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षण वर्ग आणि तरुणींनी रविवारी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली.
३. नारीवली येथील तरुणांनीही गावात सभा घेण्याची मागणी केली.
४. सभास्थळीच स्वाध्याय परिवाराचा बालसंस्कार वर्ग होतो; पण वर्ग घेणारे श्री. राजेश पाटील यांनी एक दिवसापुरते वर्गाचे ठिकाण सभेसाठी पालटले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात