Menu Close

सर्व संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! – महेश कोप्पा, श्रीराम सेना

डावीकडून श्री. दिनेश चव्हाण, श्री. महेश कोप्पा आणि श्री. मोहन गौडा

शिवमोग्गा (कर्नाटक) : आज मुसलमान भारताला इस्लामी देश, तर ख्रिस्ती त्यांचा देश बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्थितीत पुढची पिढी हिंदु रहाण्यासाठी सर्व हिंदु संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी केले. ते येथे हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदींच्या माध्यमातून आघात होत आहेत. या संदर्भात हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी येथील विनोबानगरमध्ये हे दोन दिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यात शिवमोग्गा, दावणगेरे, चित्रदुर्गा आणि चिक्कमगळुर येथून ३० धर्माभिमानी अन् ३ अधिवक्ते सहभागी झाले होते. या वेळी मुख्य वक्ता म्हणून श्री. कोप्पा यांच्यासह क्षत्रिय मराठा परिषदेचे शिवमोग्गा नगराध्यक्ष श्री. दिनेश चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *