Menu Close

हिंदु धर्म आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेनेच टिकणार आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

शृंगारतळी (गुहागर) येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे व्याख्यान !

चिपळूण : आपल्या देशाचा इतिहास फार प्राचीन आहे. आपला देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा इतिहास फार उदात्त आहे. असा दैदीप्यमान इतिहास असतांनाही जगातील जवळपास ७६ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले आहे. आज बाकी शत्रू संपले, तरी आजही धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती आपल्या छाताडावर आणि नरडीवर पाय देऊन उभे आहेत. त्यांचे आज या क्षणालाही आक्रमण चालू आहे; पण आपल्याला ते कळत नाही; कारण हिंदूंची प्रेतवत अवस्था झाली आहे. प्रेताला जसे आसपासचे काही कळत नाही, तशीच अवस्था आज हिंदु समाजाची झाली आहे. हिंदु धर्म आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेनेच टिकणार आहे, असे विचार पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी येथे मांडले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गुहागर विभागाच्या वतीने शृंगारतळी येथील भवानी सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली येथील राष्ट्रधर्मप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री नवल भागवत, सुशील पवार आणि त्यांच्या सहकारी धारकर्‍यांनी केले.

पू. भिडेगुरुजी म्हणाले,

१. जगात अत्युच्च, पवित्र अशा देशाला आव्हान देण्याचा प्रयत्न धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती करत आहेत. हिंदु समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती संस्था करत आहेत आणि आपल्यातीलच फितूर लोक त्यांना साहाय्य करत आहेत. हा आपला तिसरा शत्रू आहे.

२. ३५० वर्षांपूर्वी हा पवित्र देश, हिंदु धर्म टिकेल कि नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. देश सर्वत्र हिरवागार झाला होता. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने भगवंताने हिंदवी स्वराज्य स्थापनेचे (धर्म संस्थापनेचे) कार्य केले.

३. हिंदु समाजाला आत्मविश्‍वास देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

४. आपल्या अंत:करणात अभिमान, आदर, गर्व असतो; परंतु तो उथळ असतो. राष्ट्र आणि धर्म यांविषयी जाणीव असलेला हिंदुस्थान आपल्याला निर्माण करायचा आहे.

५. सूर्य आहे, तर सृष्टी आहे. जसे सृष्टी आणि सूर्य यांचे नाते आहे. तसेच नाते छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु समाज यांचे आहे. हे नाते हिंदु समाजाने ओळखले पाहिजे. या मायभूमीचे पांग फेडण्यासाठी प्रत्येकानेच पुढे आले पाहिजे.

६. कसे जगावे, कशासाठी जगावे यासाठी सामर्थ्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि धर्मासाठी कसे मरावे, यासाठी सामर्थ्य देणारा मंत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत.

७. हिंदुस्थानात राष्ट्रोन्नती आणि राष्ट्रउद्धाराची प्रेरणा देणारे गडेकोट आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *