कुरापतखोर चीनचा बंदोबस्त सरकार कसा करणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पेइचिंग : स्वत:च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा वन बेल्ट वन रोड अर्थात् सी.पी.ई.सी. योजनेशी भारताला जोडण्यात अपयश आल्याने चीनने आता भारतावर कुरघोडी करणे चालू केले आहे. या योजनेत अफगाणिस्तानला सामावून घेण्याच्या हालचाली करत भारताला शह देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. चीनचा सी.पी.ई.सी. ही योजना तब्बल ५७ अरब डॉलर इतकी प्रचंड खर्चिक आहे. हा रस्ता पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्याने भारताने त्यास विरोध दर्शवत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यास चीनला मध्य आणि पश्चिम आशियात सहज प्रवेश करता येणार आहे, तसेच या रस्त्यावर सर्वस्वी चीनचीच मक्तेदारी रहाणार आहे.
पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातील वर्ष १९४७ पासून बिघडलेले संबंध सुधारण्यासाठीही चीनने पुढाकार घेतला असल्याची माहिती चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पत्रकारांना दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात