व्याख्याने, धर्मशिक्षणवर्ग आणि ग्रंथप्रदर्शन यांद्वारे केले प्रसारकार्य
१. हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन
१ आणि २.१०.२०१७ या दिवशी आग्रा येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन केले होते.
२. धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन
अ. २.१०.२०१७ या दिवशी हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील खेडिकला गावातील शिवमंदिरात धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीचे महत्त्व आणि दिवाळी शास्त्रानुसार कशी साजरी केली जावी ?’, या विषयावर माहिती देण्यात आली.
आ. ८.१०.२०१७ या दिवशी हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यातील जठलाना गावातील पंजाबी धर्मशाळेत धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीविषयी शास्त्रीय माहिती देण्यात आली.
३. प्रवचन
दिपावलीच्या निमित्ताने गुरुग्राम सेक्टर ५५ येथील राधाकृष्ण मंदिरात दीपावली शास्त्रानुसार कशी साजरी करावी ?’, या विषयावर प्रवचन करण्यात आले.
४. निवेदने देणे
अ. ९.१०.२०१७ या दिवशी समितीच्या वतीने वरिष्ठ जिल्हाधिकारी श्री. राकेश मालपाणी, तसेच वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. टी.पी. सिंह यांना हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांच्या विक्रीवर अन् अवैध रूपात विक्री होणार्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर प्रतिबंध घालावा’, आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
आ. १३.१०.२०१७ या दिवशी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील डेप्युटी कमिशनर’ना दिवाळीत फटाके उडवू नयेत’, रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून द्यावे’, म्यानमारमधून आलेल्या मुसलमानांवर कर लावावे’, हिंदूंच्या सणांच्या दिवशी रेल्वे तिकिटांचे दर वाढवू नयेत’, आदी मागण्यांसाठी निवेदन दिले.
इ. गुरुग्राम येथील जिल्हा उपायुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिवाळीत फटाके फोडल्यामुळे होणार्या दुष्परिणामाविषयी सांगून देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांना विरोध करण्याविषयी निवेदन देण्यात आले.
५. फरिदाबाद येथील श्री सिद्ध पीठेश्वर हनुमान मंदिराच्या वार्षिक उत्सवात प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन
२८.१०.२०१७ या दिवशी फरिदाबाद येथील श्री सिद्ध पीठेश्वर हनुमान मंदिराच्या वार्षिक उत्सवात समितीच्या कार्यकर्त्यांनी हनुमंताची वैशिष्ट्ये आणि हिंदु एकता फेरीचे आयोजन’ यांसंदर्भात ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या वेळी नामजप, साधना, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, या विषयांविषयी उपस्थितांना अवगत करण्यात आले. समितीच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथ आणि भित्तीपत्रके यांच्या प्रदर्शनाचा १०० हून अधिक जणांनी लाभ घेतला.’
– श्री कार्तिक साळुंके, देहली
देहली येथील ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
१. ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन
अ. मथुरा येथील काली मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावले होते.
आ. दीपावलीच्या निमित्ताने गुरुग्राम सेक्टर ५५ येथे घाटा गावातील राधाकृष्ण मंदिरात, तसेच गुरुग्राम येथील हिरो मोटो कंपनीत आयोजित केलेल्या दिवाळी मेळ्यात ग्रंथ आणि सात्त्विक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होतेे.
इ. गुरुग्राम येथील मेहंदी मेळाव्यात ग्रंथप्रदर्शन लावले होते.
ई. फरिदाबाद येथील सेक्टर २९ मधील जलवायू विहार वसाहतीतील दिवाळी मेळ्यात ग्रंथप्रदर्शन लावले होते. याचा लाभ १०० जणांनी घेतला.
२. ब्राह्मण संघाच्या बैठकीत सनातन संस्थेचा सहभाग
२९.१०.२०१७ येथे विकासपुरी (देहली) येथे आणि उत्तरप्रदेशातील वेगवेगळ्या ब्राह्मण संघांचा एकत्रित महासंघ करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. अधिवक्ता राघवेंद्र शुक्ल यांनी या बैठकीच्या आयोजनात पुढाकार घेतला. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेलाही आमंत्रित केले होते. सनातन संस्थेच्या वतीने कु. मनीषा माहुर या बैठकीत उपस्थित होत्या.’
– कु. मनीषा माहुर आणि सौ. तृप्ती जोशी, देहली
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात