स्वधर्मातीलच एका इमामाला असे का वाटते, याचा विचार मुसलमान समाज करील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सिडनी : मी भारतात आलो, तर तेथील कट्टरतावादी मुल्ला आणि मौलवी यांचे काही खरे नाही. त्यांना तातडीची सुट्टी घेऊन मक्केला पळून जावे लागेल, असे विधान इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात विश्वव्यापी मोहीम राबवणारे ऑस्ट्रेलियातील इमाम महंमद ताहिदी यांनी केले. एका ट्वीटद्वारे त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त करत वरील विधान केले. भारतात माझे कुणी ऐकणारे आहे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ताहिदी हे धर्मांध मुसलमान, तसेच मुसलमान संघटना यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. आतंकवादी आक्रमण झाल्यास ते संबंधित भागातील इमामांना त्याचा दोष देतात. ब्रुसेल्स आक्रमणानंतरही त्यांनी इमामांवर तोफ डागत सर्वसामान्य मुसलमानांना जिहादी चिथावण्या देण्याचे बंद करा, अशा शब्दांत कानउघाडणी केली होती. तसेच हिजाब प्रथेला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकांमुळे ऑस्ट्रेलियात त्यांच्यावर आक्रमणही झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात