मुंबई : संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्यांकांना वेठीस धरले जाते. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे. देशात अराजकता माजली असून दलित, अल्पसंख्यांक वर्ग दहशतीखाली जगत आहे, असे प्रतिपादन गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी केले. मुंब्रा येथे २६ डिसेंबरला आयोजित केलेल्या मुशायरा कार्यक्रमात ते बोलत होते. (अल्पसंख्यांकांवरील तथाकथित अत्याचारांविषयी कळवळा असलेल्या आमदार ठाकोर यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ते म्हणाले, भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे संसदीय लोकशाही आणि संविधान यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढ्याला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे. हा लढा बघूनच आम्ही मैदानात उतरलो. त्यांच्या साथीने महाराष्ट्रातही हा लढा आम्ही उभारू. (लोकशाही वाचवण्यासाठी लढा देण्याची भाषा करणार्या आमदार ठाकोर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप दिसत नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात